ठाणे (निलेश मोरे) - तळागाळातल्या महिलांचं कार्य शोधून त्यांचा यथोचित सन्मान करणे ही केलेल्या कामाची पोचपावती आहे. अशा महिलांना पुढे आणून त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचं काम ऑल्वेज हेलपिंग हॅन्ड संस्थेच्या अध्यक्षा सारिका कदम करत असल्याचं प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ऑल्वेज हेलपिंग हॅन्ड आणि आर्ट इन फॅशनच्या संस्थापक अध्यक्ष सारिका कदम, सल्लागार प्रभाकर दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे पॉवर ऑफ वुमन पुरस्कार वैतारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, डॉ मिनी बोधनवाला, सोनाली लोहार, पत्रकार हेमलता वाडकर, रंजिता शर्मा यांना पॉवर ऑफ वुमन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आज असं एकही क्षेत्र नाही जिथे महिला दिसत नाही. जवळपास सर्वच क्षेत्रात महिला सक्षम आणि प्रभावीपणे आपलं कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. चूल आणि मुलं पर्यंत असणारी सीमारेषा आज महिला ओलांडून पुढे जात आहेत. ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. ऑल्वेज हेलपिंग हॅन्ड ही संस्था केवळ पुरस्काराचे आयोजनच करत नसून महिलांबाबत आदर निर्माण करून त्यांच्यात प्रभावी नेतृत्व घडवण्याचं काम ही संस्था करत आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सल्लागार प्रभाकर दळवी, संचालक संजय दरेकर, शैलेश मोहिते, किशोर केदारी, नवनाथ अभंग, नितीन गडवे, मानसी भिरवडेकर, रश्मी मोरे, अशोक दळवी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment