आठवडाभरात धोकादायक इमारतींची यादी जाहीर होणार -
मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. नागरिकांचे मृत्यू होऊ नयेत म्हणून महापालिकेकडून दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहिर करून या इमारतीं रिकाम्या करण्याचे आवाहन केले जाते. यावर्षीही महापालिकने धोकादायक इमारतींची यादी जाहिर करण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान मागील वर्षी जाहिर केलेल्या 555 धोकादायक इमारतींपैकी अद्याप 133 इमारतीत शेकडो रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मे अखेरपर्यंत अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या जातील असा दावा प्रशासनाने केला आहे.
मुंबई महापालिकेकडून सी- 1 कॅटेगेरीमधील अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्य़ा करण्यासाठी पालिका रहिवाशांना नोटिस पाठवून सूचना करते. मात्र यंदा पावसाळा जवळ आला तरी मागील वर्षातल्या 133 इमारती रिकाम्या करण्यास पालिकेला अपयश आले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पालिकेकडून यंदाच्या धोकादायक इमारती जाहिर केल्या जातील. त्यामुळे धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी अजून वाढणार आहे. मुंबईत मागील वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या एकूण 555 धोकादायक इमारतींपैकी पालिकेने १२१ इमारतीं पडल्या आहेत. ११२ इमारती रिकाम्या केल्या आहेत. १६७ इमारतींना कोरताने स्ट दिला आहे. ३७ इमारती तांत्रिक वादात अडकल्या आहेत. तर ११८ इमारतींचे वीज आणि पाणी कापण्यात आले आहे.
गेल्यावर्षी घाटकोपर येथी साई सिद्धी इमारत दुर्घटना घडली होती. दुर्घटनेतील इमारत ‘सी-३’ कॅटेगरीतील होती. मात्र तरीही ही इमारत कोसळली आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता. इमारतीला धोकादायक जाहीर करण्याआधी महापालिकेचे अधिकारी त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करतात. त्यानंतर इमारत धोकादायक असल्यास ती रिकामी करण्यासाठी नोटीस दिली जाते. पालिकेकडून अशा अतिधोकादायक इमारतींचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. तसेच पाणी जोडणीही तोडली जाते. मात्र तरीही काही ठिकाणी रहिवाशी धोकायदायक जागा रिकामी करण्यास टाळाटाळ करतात अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकार्याने दिली.
अशी होते कार्यवाही -
महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर सी-१, सी -२ आणि सी-३ अशी कॅटेगरी केली जाते. सी-१ मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-२ यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-३ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. मुंबई महापालिका कायदा १८८८ अंतर्गत पालिकेकडून नोटीस बजावली जाते. सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात.
प्रबोधनासाठी गाड्या घेणार -
मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे, पुनर्वसनाची हमी नसल्यामुळे आणि अनेक प्रकरणांत बिल्डर फसवणूक करण्याच्या भितीने रहिवासी धोकादायक इमारती रिकाम्या करीत नाहीत. त्यामुळे रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासन लवकरच ६ ते ७ स्पेशल गाड्या घेणार आहे. यामधून पालिका अधिकारी कर्मचारी विभागवार दौरा करून धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या रहिवाशांचे प्रबोधन करणार आहेत. इमारतींचे नियम काय आहेत, नियम मोडल्यास होणारे दुष्परिणाम आणि ओढवणारी आपत्ती याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment