त्या सहा नगरसेवकांना कोंकण आयुक्तांची नोटिस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2018

त्या सहा नगरसेवकांना कोंकण आयुक्तांची नोटिस


14 मे रोजी हजर राहण्याचे आदेश - 
मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता मजबूत करण्यासाठी मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना कोंकण आयुक्तांनी नोटिस पाठवली आहे. या नोटिसनुसार सहाही नगरसेवकांना सुनावणीसाठी 14 मे रोजी हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोंकण आयुक्तांनी काही महिन्यापूर्वीच याला नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा नोटिस पाठवल्याने राज्यातील सत्ताधारी भाजपाकडून शिवसेनेला व्यसन घालण्यासाठी असे प्रकार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मनसेतून शिवसेनेत प्रवेश करून दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला धक्का दिला. या प्रवेशानंतर मुंबईतील राजकारण ढवळून निघाले. या प्रकारानंतर मनसेने य़ा नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करावे, त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकीत बसण्यास परवानगी देऊ नये अशी याचिका कोकण आयुक्तांकडे करून मनसेने या नगरसेवकांची कोंडी केली. त्यानंतर या नगरसेवकांना काहीवेळा सुनावणीला हजर राहावे लागले. निर्णय़ होईपर्यंत जवळपास सहा महिने या नगरसेवकांना पालिकेच्या कोणत्याही सभांना बसता आले नाही. शिवाय शिवसेनेतही सामील होता आले नाही. मात्र त्यानंतर कोकण आयुक्तांनी या नगरसेवकांना गट तयार करता येईल तशी मान्यता दिली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी पालिका सभागृहात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हे नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याचा जाहिर केले. दरम्य़ान सद्या सभागृहात शिवसेनेसोबत हे सहाही नगरसेवक बसत असून त्यांनी पक्षाच्या कामालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, वादावर पडदा पडला असतानाच कोकण आयुक्तालयात सुनावणीला हजर राहण्याचे या नगरसेवकांना नोटिस बजावण्यात आल्याने यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad