पेंग्विनमुळे १३ महिन्यात राणीबागेला १८ लाख पर्यटकांनी दिली भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेंग्विनमुळे १३ महिन्यात राणीबागेला १८ लाख पर्यटकांनी दिली भेट

Share This
मुंबई - भायखळा येथील जिजामाता उद्यान म्हणजेच राणीबागमध्ये हंबोल्ट पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या १३ महिन्यात १८ लाख पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली असून त्या माध्यमातून पालिकेला ५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजयकुमार त्रिपाठी यांनी दिली. 

मुंबईतील बच्चे कंपनीसाठी आवडते स्थान म्हणजे भायखळा येथील राणीबाग. राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचे व सौंदर्यीकरणाचे काम सध्या सुरु आहे. थीम बेस ब्युटिकेशन केल्याने पर्यटक वाढले असून गार्डन, जापनीज गार्डन, वॉटर फॉल सेल्फी पॉइंट यामुळे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढले आहे. पेंग्विन आणण्याआधी २०१६ - १७ मध्ये राणीबागला वर्षाला १३ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. या पर्यटकांच्या माध्यमातून पालिकेला ६७ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. पेंग्विन आल्या नंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन होऊन २०१७ - १८ मध्ये १९ लाख पर्यटकांनी भेट दिली. त्या माध्यमातून ४ कोटी ३७ लाख ५३ हजार ३९८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, तर एप्रिल महिन्यात १ लाख २५ हजार पर्यटकांनी राणीबागला भेट दिली यामधून पालिकेला ५२ लाख २७ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या प्रकारे गेल्या १३ महिन्यात राणीबागला १८ लाख ४७ हजार ६५६ पर्यटकांच्या माध्यमांतून ४ कोटी ८९ लाख ८० हजार ३९८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages