मुंबई - घाटकोपर डेपो येथे असलेल्या भूखंडावर सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत असून या कामाची चौकशी करण्याची मागणी एन विभाग कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
पंत नगर घाटकोपर येथील बेस्ट डेपोला लागून मोकळा भूखंड आहे. या भूखंडाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. यासाठी पालिकेने निरमा कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांची नियुक्ती केली होती.
कंत्राटदाराने या भूखंडाचे सुशोभीकरण केले, मात्र काही दिवसातच भिंती आणि रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. कंत्राटदाराने काम केल्यावर काही दिवसातच भिंती आणि रस्त्यावर भेगा पडल्याने जागृत नागरिक असलेल्या आनंद पारगावकर यांनी पालिकेच्या एन विभागाने या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पारगावकर यांनी एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंता (परिरक्षण) यांनी लेखी तक्रार दिली आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत असल्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी पारगावकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment