Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगरात भारनियमन सुरू


मुंबई - महापारेषणच्या (४०० के.व्ही. ग्रहण केंद्र) कळवा येथील उपकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता (६०० एम.व्ही.ए.चे) रोहित्र युनिट-२ मध्ये बिघाड होऊन आग लागली. यामुळे रोहित्र-१ च्या केबलचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान येथील दोन्ही युनिट बंद पडल्याने मुंबई उपनगरात भारनियमन सुरू झाले आहे. मात्र, आता रोहित्र- २ ची दुरस्ती करण्यासाठी सुमारे ३० ते ४० दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महापारेषणला युनिट-१ दुरुस्त करण्यास सुमारे ७ दिवसात होईल असे सागंण्यात आले आहे. तर कळव्यातील झालेला बिघाड दुरुस्त होण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागणार असला तरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी उद्यापर्यंत वाट पहावी लागणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी पांडुरंग पाटील यांनी सांगितले. मात्र, युनिट २ चे रोहित्र कार्यन्वित करण्यासाठी लागणारा कालावधी आणि शहरातील विजेची मागणी पाहता उपनगरीय भागात भारनियमनाची टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे. तसेच दुरुस्तीच्या काळात ठाणे, नवी मुंबईतील अनेक ठिकाणी वीज खंडित होणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

या बिघाडामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण पूर्ण प्रयत्न करत आहे परंतु, तरीही महापारेषणच्या या बिघाडामुळे महावितरणच्या ग्राहकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महापारेषण आणि महावितरणचे अभियंते कर्मचारी रात्रीपासून विजपुरवठा सुरुळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच महावितरण व महापारेषणला सहकार्य करावे, असे आवाहनही वीज वितरण कंपन्याकडून करण्यात आले आहे. तसेच वीज भारनियमनामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गैरसोईबद्दल महावितरणकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.

उपनगरांनाही फटका - 
'महावितरण'च्या उपकेंद्रातील बिघाडाचा परिणाम मुंबईतील वीजवितरण व्यवस्थेवरही झाला. यामुळे शुक्रवारी पहाटेपासून आम्हाला वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, चेंबूर, घाटकोपर, टिळकनगर व विक्रोळी या भागांत अनियमित पद्धतीने भारनियमन करावे लागले. महावितरणकडून नियमित वीजपुरवठा झाल्यानंतर आम्ही आमच्या वितरण भागांमध्ये संध्याकाळी ५.१५ वाजल्यापासून वीजपुरवठा सुरळीत केला', असे स्पष्टीकरण 'रिलायन्स एनर्जी'च्या प्रवक्त्याने शुक्रवारी रात्री दिले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom