Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

घाटकोपरमध्ये विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू


मुंबई - घाटकोपर पश्चिम येथील जीवदया लेनजवळ गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एक चार्टर्ड विमान कोसळले. जुहू येथून सरावासाठी विमान निघाले असताना त्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

घाटकोपर जीवदया लेन येथे दुपारी एकच्या सुमारास मोठा आवज झाला. आगीचे लोळ उठले. नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली असता एक चार्टर्ड विमान कोसळल्याचे निदर्शनास आले. सी-९० जातीचे हे विमान होते. सकाळीच विमानाची पूजा करून मिठाई वाटण्यात आली होती. दुपारी या विमानाची ट्रायल रन घेतली जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये विमानातील पायलट मारिया कुबेर, कोपायलट प्रदीप राजपूत, इंजिनिअर मनिष पांडे, इंजिनिअर सुरभी आणि पादचारी गोविंद पंडित या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या लवकुश कुमार आणि महेश कुमार यांच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर दुर्घटनेची योग्य चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. याप्रकरणी उड्डाण मंत्रालयाने डीजीसीएला चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला - 
ज्या ठिकाणी हे विमान कोसळले. त्या आजूबाजूला मोठी लोकवस्ती, रुग्णालये आहेत. विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड आहे हे लक्षात आल्यानंतर पायलट मारिया यांनी घाटकोपरमधील यांनी घाटकोपरमधल्या जीवदया लेनजवळ इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी विमानाचे क्रॅश लॅंडिग केले. ही दुर्घटना जवळपासच्या इतर रहिवासी वस्तीत झाली असती तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असती. विमानाच्या महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. 

जेवणाच्या सुट्टीमुळे जीवितहानी टळली - 
घाटकोपरमध्ये जीवदया लेनमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विमान पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सदर इमारतीचे बांधकाम करणारे कामगार हे दुपारी १ ते २ या वेळेत जेवण्यासाठी गेले होते. त्यामुळे जेवणाच्या सुट्टीमुळेच मोठी जीवितहानी टळली.

अपघातग्रस्त विमान - 
या विमानाचा यापूर्वी अलाहाबादमध्ये अपघात झाला होता. अपघातानंतर हे विमान उत्तर प्रदेश सरकारने २०१४ साली मुंबईतील दीपक कोठारी यांच्या मालकीच्या ‘यू.आय’ या कंपनीला विकले होते. उत्तर प्रदेशाचे मुख्य माहिती सचिव अवनीश अवस्थी यांनी दिलेल्या माहितीमुळे हा खुलासा झाला आहे.

जबरदस्ती उड्डान करायला लावले - 
उड्डानापूर्वी मारियाचा फोनवरुन पतीशी संवाद झाला होता. मारियाने हवामान खराब असल्याचं सांगत उड्डाणास नकार दिला होता. यु वाय एव्हीएशन कंपनीने जबरदस्ती उड्डान करायला लावले. हवामान खराब असताना देखील कंपनीने विमानाचे उड्डान करण्याचे आदेश दिले. विमानाची चाचणी होणार नाही असं मारियाने फोनवरुन सांगितले होते. चाचणी न झाल्याने मारियाने टेक ऑफसाठी विरोध देखील केला होता. तरी देखील जबरदस्तीने विमानाचे उड्डान करण्यात आले. मारियाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन उड्डान करण्यात आल्याचा आरोप मारीयाचे पती अॅड. प्रभात कथुरिया यांनी यांनी केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom