मुंबई - सोमवारी वडाळा दोस्ती एकर येथील लॉयड इमारतीच्या जवळील रस्ता खचून दुर्घटना घडली आहे. अशीच दुर्घटना ब्लॉसम आणि इतर इमारतींच्या ठिकाणी घडू शकते अशी भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पाऊस जोरात पडताना आम्ही खिडकीमध्ये येऊन बसतो आणि देवाकडे पुन्हा कोणतीही दुर्घटना घडू दे नको अशी प्रार्थना करतो असे राहुल डागा यांनी सांगितले. महापालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. दुर्घटना घडल्यावर महापालिकेला जाग येणार आहे का असा प्रश्न डागा उपस्थित केला. आयआयटी आणि व्हीजेटीआय या संस्थांकडून या ठिकाणचे सॉईल टेस्टिंग करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दोस्ती एकरमध्ये ब्लॉसम, कार्नेशन, लॉयड इस्टेट, डॅफोडिल या इमारती आहेत. या इमारतीजवळच दोस्ती बिल्डरचे काम सुरु असून सोमवारी सकाळी जमीन खचल्याची दुर्घटना घडली त्यात १५ वाहनांचे नुकसान झाले आहे. लॉयड इमारत आणि या बांधकामात ३० फुटाचा रस्ता होता. हा रस्ता नसता तर इमारतीला धोका निर्माण झाला असता. बिल्डरचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणाहून ब्लॉसम ही इमारत लागून आहे. सोमवारी दुर्घटना घडली तेव्हा आम्ही विभागाची पाहणी करताना ब्लॉसम इमारतीच्या खालून माती आणि पाणी वाहून जाताना दिसत होते. हे पाहून आम्हाला धक्का बसला असे मनोज गुरव यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी इमारतीची संरक्षण भिंत पडली, आज पोडीयम, बेसमेंटमधील पार्किंग धोकादायक झाले आहे, पिलर सरकले आहेत, अनेक ठिकाणी भेगा गेल्या आहेत, मीटर कॅबिन खराब झाली आहे अशी माहिती गुरव यांनी दिली. आमच्या इमारतीला धोका असल्याचे आम्ही बिल्डरला सांगितले. तसेच मुख्यमंत्री, पालिका आयुक्त, इमारत प्रस्ताव विभाग यांना कळविले मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बाजूच्या बांधकामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असल्याचे सांगता असताना पालिकेने आम्हालाच नोटीस दिली. इमारत दुरुस्त न केल्यास आमच्यावरच कारवाई करण्याचे पालिकेने कळविले होते. आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आणि सॉईल टेस्टिंगची मागणी करत असताना त्याकडे पालकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे गुरव यांनी सांगितले.
लॉयड प्रमाणेच डॅफोडिल या इमारतीची अवस्था झाली आहे. इमारतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.इमारतीच्या भेगांमधून माती पडत आहे. पालिकेकडे आम्ही सॉईल टेस्टिंग रिपोर्ट मागत आहोत. हा रिपोर्ट दिला जात नाही. माहिती अधिकारातही हा रिपोर्ट दिला जात नसल्याने पालिकेकडे हा रिपोर्ट आहे कि नाही याबाबत शंका निर्माण होत असल्याचे रून जेकब यांनी सांगितले. आमच्या सोबत तीन माजी खासदार, विरोधी पक्ष नेते, नगरसेवक असतानाही बिल्डरचे काम बंद करायला दोन तास लागले मग सामान्य नागरिकांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा विचार करण्याची गरज असल्याचे जेकबी यांनी म्हटले.

बिल्डरने विश्वासघात केला -
बिल्डरबरोबर आमचे चांगले संबंध होते. बिल्डर आमची इमारत दुरुस्त करून देईल असा विश्वास होता. मात्र बिल्डरने आमचा विश्वासघात केला असे राहुल डागा यांनी सांगितले. पालिकेने योग्य कारवाई न केल्यास आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा राहुल डागा यांनी दिला आहे.