Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात द्वितीय

नवी दिल्ली - माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र सरकारने देशभरात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

येथील हॉटेल हयात मध्ये या पुरस्कारचे वितरण करण्यात आले. माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम, महाराष्ट्र द्वितीय आणि तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिलां मागे 70 पर्यंत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य दिले होते. केरळ राज्याने हा मृत्यूदर 46 पर्यंत आणलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर 61 पर्यंत असून तामिळनाडूमध्ये हा दर 68 पर्यंत आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ.सावंत म्हणाले, माता मृत्यूदरात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर पोहोचल्याचे समाधान आहे. मात्र हा दर पुढील काही काळात आणखी कमी करण्याचा प्रयत्न राहील.

मातृत्व अभियानामध्ये महाराष्ट्र प्रथम -या अभियानांतर्गत असलेल्या संकेतस्थळावर खाजगी तसेच सरकारी डॉक्टर यांची नावे नोंदवावी लागतात. या संकेतस्थळावर देशभरातील जवळपास 5000 डॉक्टरांनी नावे नोंदविली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक600 डॉक्टरांचा समावेश आहे. दर महिन्याच्या 9 तारखेला मातृत्व अभियानांतर्गत डॉक्टर आपल्या सेवा देतात. त्यासाठी महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी स्वीकारला.

महाराष्ट्रात हे अभियान केंद्र शासनाने सुरू करण्यापूर्वी लागू केले होते. या अंतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. यासह एनिमिया ग्रस्त गर्भवती महिलांना आर्यनचे इंजेक्शन दिले जाते. याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या प्रसूती दरम्यान दिसून आलेला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom