महानगरांसाठी स्वतंत्र क्रीडा आराखडा तयार करणार - क्रीडामंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2018

महानगरांसाठी स्वतंत्र क्रीडा आराखडा तयार करणार - क्रीडामंत्री

मुंबई - चांगले खेळाडू घडविण्यासाठी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात उच्चप्रतीच्या क्रीडा सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. क्रीडा सुविधा निर्माण करताना महानगरांसाठी स्वतंत्र क्रीडा आराखडा तयार करण्यात येईल, असे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

महानगरांसाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्यासंदर्भातील बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, विभागीय क्रीडा आयुक्त जगदीश पाटील, आयुक्त सुनील केंद्रेकर, सह संचालक नरेंद्र सोपण, क्रिकेटपटू प्रवीण आमरे, वर्षा उपाध्ये आदी उपस्थित होते.

तावडे यावेळी म्हणाले, महानगरपालिका, नगरपालिका, सिडको आणि क्रीडा विभाग या सर्वांनी एकत्र बसून सर्वंकष आढावा घ्यावा आणि याबाबत सर्वंकष अहवाल द्यावा. कोणकोणते खेळ कोणकोणत्या ठिकाणी खेळले जातात, यासाठी काय सुविधा आहेत किंवा निर्माण करणे आवश्यक आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. पुढील दहा वर्षांसाठी खेळाडुंना आवश्यक असणाऱ्या सुविधा, खेळाडुंसाठी खेळनिहाय मैदान याचाही अभ्यास करण्यात यावा, असे तावडे यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad