नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) यांच्या माहितीनुसार या वर्षी मे महिन्यापर्यंतच्या नऊ महिन्यांमध्ये संघटित क्षेत्रात ४४,७४,८५९ इतक्या जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीमध्ये ही नोकऱ्या मिळण्याची नोंद झाली आहे. या कालावधीत वास्तविक नोंदणीकृत सदस्यांची जी संख्या ईपीएफओने आधी वर्तवली होती, अंदाजित केली होती, ती मात्र कमी झाली आहे. त्यांनी या कालावधीत ४१,२६,१३८ इतके सदस्य नोंदणीकृत असतील, असे म्हटले होते. मात्र, ती संख्या ३७३१२५१ इतकी झाली आहे. मे महिन्यात मात्र सर्वाधिक सदस्य जुळले गेले, ती संख्या ७,४३,६०८ इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य २,५१,५२६ हे १८ ते २१ या वयोगटातील आहेत. तसेच १,९०,०९० इतके सदस्य हे २२ ते २५ या वयोगटातील आहेत.
ईपीएफओने म्हटले आहे की, हे सुरुवातीचे आकडे आहेत. याचे कारण कर्मचाऱ्यांची गणना ही सतत चालणारी प्रक्रिया असून या संख्येत आणखी कर्मचारीही समाविष्ट होऊ शकतात. त्यातच ज्याना हंगामी स्वरूपात नोकरी आहे, त्यांचाही समावेश यात असतो. मात्र, पूर्ण वर्षामध्ये ही आकडेवारी नेमकी समजू शकते. नवीन सदस्यांची या नऊ महिन्यांमधील टक्केवारी ९.५७ टक्के आहे. ईपीएफओ सामाजिक सुरक्षा योजना अमलात आणते. संघटित व असंघटित क्षेत्रासाठी तीन योजना असून १९५२ च्या प्रोव्हिडंट फंड, १९७६ च्या एम्प्लॉईज डिपॉझिट योजना (ईडीएलआय) व १९९५ ची कर्मचारी निवृत्ती वेतन योजना अशा या तीन योजना असून ६० दशलक्षांपेक्षा अधिक कर्मचारी सदस्य या योजनांशी जुळलेले आहेत. तसेत १० ट्रिलियन रुपये इतका कॉर्पसही त्यांचा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ईपीएफओने पेरोल डाटा अद्ययावत करण्यास सुरुवात केली व अधिकृत वेबसाईटवर तो आणला.