नागपूर - खासगी रुग्णालयातील परिचारिकांच्या वेतनासाठी किमान वेतन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असे आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य नागोराव गाणार यांनी खासगी रुग्णालयातील परिचारिकांच्या अल्पवेतनाबाबतचा प्रश्न विचारला होता. देशमुख म्हणाले, अनेक हॉस्पिटलमध्ये किमान वेतन देण्याबाबत अंमलबजावणी होत नाही. त्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. यासाठी रुग्णालयांची तपासणी करुन किमान वेतन अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, जयंत पाटील यांनी भाग घेतला.