दुधाला प्रतिलिटर 5 रुपये, दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुधाला प्रतिलिटर 5 रुपये, दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान

Share This
नागपूर - दुधाच्या निर्यातीसाठी 5 रुपये प्रतिलिटर व दूध भुकटीच्या निर्यातीसाठी 50 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे विधानसभेत पदुममंत्री महादेव जानकर व विधानपरिषदेत राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घोषित केले. 

यावेळी जानकर म्हणाले, राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रक्रिया संस्था यांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधासाठी कोणतेही अनुदान देय राहणार नाही. तथापि पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधासाठी राज्य शासन प्रतिलिटर 5 रुपये रुपांतरण अनुदान देईल. मात्र सदर अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रुपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेस अनुज्ञेय राहील. तसेच जे दूध भुकटी उत्पादक 5 रुपये प्रतिलिटर प्रमाणे अनुदानाचा लाभ घेतील, त्यांना दूध भुकटी निर्यातीसाठीच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

10 जुलै रोजी घोषित केलेली योजना तसेच आज रोजी घोषित करण्यात येत असलेली योजना या दोन्ही योजनांचा लाभ संबंधित सहकारी/खासगी दूध प्रक्रिया संस्था/दूध पुरवठा करणाऱ्या संस्था यांनी जर 21 जुलै पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटर दर दिल्यासच अनुज्ञेय राहील. वरील निर्णयास राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध उत्पादक/दूध प्रक्रिया करणाऱ्या/दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांनी एकमताने सहमती दर्शविलेली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages