नागपूर - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव प्रवेश खासगी शिक्षण संस्थांनी नाकारल्यास अशा शाळांवर कारवाई करणार असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत राखीव प्रवेश नाकारत असल्याचा प्रश्न सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, शिक्षणापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. ज्या शाळा प्रवेश नाकारतील त्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार नोटीसा बजावण्यात येतील. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, हेमंत टकले, डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी भाग घेतला.