Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अंधेरी पूल दुर्घटना - चौकशी करून दोषींवर कारवाई करा - सचिन अहिर


मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पादचारी पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्देवी असून या दुर्घटनेला संपूर्णपणे रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहे. ही निसर्गनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित आपत्ती असून या प्रकरणाच्या चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.

एकीकडे सरकार स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेनच्या घोषणा करत आहे. मुख्यमंत्री परदेशात जाऊन हायपर लूपसारख्या सेवांची चाचपणी करत आहेत, मात्र मुंबई शहराची लाईफलाईन असलेल्या अत्यंत उपयुक्त अशा उपनगरीय रेल्वे सेवेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. गेल्यावर्षी एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुंबईतील सर्व २५७ फुटओव्हर ब्रीजचे अॉडिट करून त्यांच्या दुरूस्तीसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती रेल्वे आणि मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली होती. शिवाय एल्फिन्स्टन येथील दुर्घटना घडल्यानंतर आपल्या प्रशासनावर अविश्वास दाखवून मोठा गाजावाजा करत पुलाची उभारणीही भारतीय सैन्यदलामार्फत करण्यात आली. सैन्यदलाने निर्माण केलेल्या पुलाचे तमाम मुंबईकरांनी स्वागत केले. मात्र आज दुर्घटनाग्रस्त झालेल्या पुल हा दुरुस्तीपासून दुर्लक्षित राहिला. या पुलाचीही वेळीच दुरुस्ती झाली असती तर आजची दुर्घटना टाळता आली असती. त्यामुळे आजच्या दुर्घटनेला महापालिका आणि रेल्वे प्रशासन जबाबदार असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर करवाई व्हावी अशी मागणीही अहिर यांनी केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom