मुंबई - घाटकोपर वॉर्ड क्रमांक १२७ चे शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम ऊर्फ सुरेश पाटील यांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यामुळे पाटील यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पालिकेला तसे पत्र पाठवून नियमानुसार एका महिन्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे कळवण्यात आले आहे. पाटील हे घाटकोपर भीमनगर भटवाडी परिसरातील विभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या नगरसेविका रितू तावडे यांचा पराभव केला होता. पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायालयात होते. त्यावर झालेल्या निर्णयानंतर नगरविकास विभागाने एका महिन्यात कारवाई करण्याबाबत कळवले आहे.
Post Top Ad
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.