Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मानखुर्दमध्ये तडे गेलेल्या ट्रॅकवरून तीन ट्रेन धावल्या


मुंबई 10/7/2018 - मानखुर्द ते गोवंडी दरम्यान तडा गेलेल्या रेल्वे रुळाला फडके बांधून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा दुर्दैवी प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. गंभीर बाब म्हणजे, तडा गेलेल्या रुळावरून तीन लोकलही धावल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. मंगळवारी संध्याकाळी मानखुर्द ते गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याचा प्रकार घडला. त्यामुळे हार्बर मार्गावरील अप दिशेकडील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानकात कार्यरत असलेल्या गँगमनने लोकल गाड्या रेल्वे रुळात फसू नयेत किंवा कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी रुळामध्ये फडका ठेवून लोकलच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, असा प्रयत्न केला. मात्र, गँगमनचा हा प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडले आणि त्यांनी धाव घेत दुरुस्तीकाम सुरू केले. अखेर संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू करण्यात यश आले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom