झाड पडून चार जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2018

झाड पडून चार जखमी


मुंबई १०/७/२०१८ - मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चांदिवली येथे तीन जणी तर चारकोपर येथे एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. निशा वेगडा (२५), उपर्णा, प्रियंका अशी या तरुणींची नाव असून त्या चांदिवलीतील ओबेरॉय गार्डनजवळील बॉम्बे रेवास कंपनीमध्ये कामाला होत्या. कंपनीतून काही कामासाठी फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी रिक्षात बसल्या असता रिक्षावर अचानक सुरुचं झाड कोसळलं. या तिघींनाही जवळच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये निशा गंभीर दुखापत झाली असून उपर्णा आणि प्रियंकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर चांदिवलीतील चारकोपमधील सेक्टर ४ येथेही सायंकाळी ५.५५ च्या दरम्यान झाड कोसळून पूजा पावसकर (४०) ही महिला जखमी झाली. या जखमी महिलेला फिनिक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात अालं अाहे.

Post Bottom Ad