'निर्भया फंड'अंतर्गत मुंबईसाठी २२५ कोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 August 2018

'निर्भया फंड'अंतर्गत मुंबईसाठी २२५ कोटी

नवी दिल्ली - देशातील प्रमुख आठ शहरांमधील महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी, केंद्र शासनाने महत्त्वाचे पावले उचलत 'निर्भया फंड'अंतर्गत २ हजार ९१९ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी वितरित केला असून मुंबई शहरासाठी २२५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने महिलांसाठी सुरक्षित शहर बनविण्यासाठी देशातील प्रमुख आठ शहरांची निवड केली. या शहरांमध्ये महिलांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत एकूण २ हजार ९१९ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला. मुंबईसाठी २२५ कोटींचा निधी देण्यात आला असून मुंबईसह, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, बेंग्लुरू, हैद्राबाद आणि लखनऊ या शहरांची निवड करण्यात आली.

निर्भया फंड अंतर्गत मुंबई शहरातील गुन्हे प्रवण भागात जीआयएस मॅपिंग सेवा उभारण्यासाठी, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी, गुन्हे तपास अधिकारी व विधी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. झोपडपट्टी भागातील महिलांवरील शारीरिक अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस दिदी कार्यक्रमास सक्षम करण्यात येते. तसेच, माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यात येतो.

Post Bottom Ad