संविधान जाळणाऱ्यांच्या अटकेसाठी रास्ता रोको - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संविधान जाळणाऱ्यांच्या अटकेसाठी रास्ता रोको

Share This
मुंबई - दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांविरोधात अटकेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी दहिसर चेकनाका येथे रास्ता रोको करण्यात आला. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. रिपाइंचे मुंबई युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, वॉर्ड अध्यक्ष आनंद कांबळे, सम्राट गायकवाड, चंद्रकांत कांबळे, रामेश्वर ढेंगे, विशाल क्षीरसागर व इतर २०० कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे संविधानाची होळी करून डॉ. आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करीत दहिसर चेकनाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी रमेश गायकवाड व इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages