मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - रामदास आठवले

Share This

ठाणे - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार आग्रही आणि सकारात्मक असले तरी हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्र सरकारने अध्यादेश काढून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्के करावी आणि सर्वांना २५ टक्के आरक्षण ८ लाखांच्या क्रिमीलेअर अंतर्गत देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली.

रिपब्लिकन पक्षाचा ६१वा वर्धापन दिन येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील ढोकाली येथील हायलँड पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना, भाजपाचे सर्व आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत, असे आठवले यांनी या वेळी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी कुणाशी युती करायची हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, एमआयएमबरोबर युती करून त्यांचा फायदा होणार नाही, उलट या युतीचा फायदा भाजपालाच होईल  आठवले म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages