मुंबई - गणेशोत्सव आगमनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेने चौपाटयांसह विसर्जन स्थळांवर सर्व सुविधांनीयुक्त उत्तम अशी व्यवस्था केली असून गणेशाच्या आगमनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे पालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
गिरगांव चौपाटी ही दक्षिण मुंबई शहरातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रख्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली चौपाटी असून या चौपाटीवर दक्षिण व मध्य मुंबईतील अनेक छोटी / मोठी सार्वजनिक मंडळे आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन दरवर्षी अत्यंत हर्षोल्हासाने व भक्तीभावाने करीत असल्याने गिरगांव चौपाटीवर प्रमुख गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महापालिका सर्व सुविधांसह सज्ज झाली आहे.
गणेशोत्सव हा संपूर्ण मुंबईकरांसाठी महापर्वणीच असून देश-विदेशातून नागरिक या उत्सवासाठी मुंबईत येत असतात. उत्सवाच्या काळात महापालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क व सुसज्ज असून चौपाटय़ा सुसज्ज व सतर्क ठेवण्यासोबत आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा नागरिकांना योग्यरित्या उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना दिले आहेत.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहिनासहीत मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहीत सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोईग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशिन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामुग्रीदेखील विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आली आहे.
विसर्जनाची व्यवस्था -
नैसर्गिक विसर्जन स्थळे ही ६९ असून कृत्रिम विसर्जन स्थळे ही ३१ आहे. त्यासोबतच विसर्जन स्थळांवर पुरविण्यात आलेल्या सुविधांमध्ये स्टील प्लेट ८४०, नियंत्रण कक्ष ५८, जीवरक्षक ६०७, मोटरबोट ८१, प्रथमोपचार केंद्र ७४, रुग्णवाहिकांची संख्या ६०, स्वागत कक्ष ८७, तात्पुरती शौचालये ११८, निर्माल्य कलश २०१, निर्माल्य वाहन/डंपर १९२, फ्लड लाईट १९९१, सर्च लाईट १३०६, निरिक्षण मनोरे ४८, जर्मन तराफा ५०, मनुष्यबळ (कामगार) ६१८७, मनुष्यबळ (अधिकारी) २४१७ आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.
कृत्रिम तलावांचा वापर करा - पालिकेने कृत्रिम तलावांत केलेल्या सेवा-सुविधांमुळे अनंत चतुर्दशीदिनीही कृत्रिम तलावांत जास्तीत-जास्त गणेश भक्त गणेश मूर्तींचे विसर्जन करतील, अशी आशाही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केली आहे.

विसर्जनदिनी पावित्र्य जपा - गणेश विसर्जनदिनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जन प्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे, जेणेकरुन अप्रिय घटना टाळता येतील, असे आवाहनही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संयुक्तपणे केले आहे.
२ लाख गणेश मूर्तींचे विसर्जन - सन २०१७ मध्ये नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या सार्वजनिक ११ हजार ९८, घरगुती १ लाख ९१ हजार २५४ गणेश मूर्ती अश्या एकूण २ लाख २ हजार ३५२ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर सन २०१७ मध्ये कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या सार्वजनिक ६५२, घरगुती २८ हजार ६३१ गणेश मूर्ती अश्या एकूण २९ हजार २८३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.