आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 September 2018

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगार - मुख्यमंत्री


ठाणे - मराठा, धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची आमची तयारी आहेच पण आम्ही शासकीय नोकऱ्यांच्या पुढे जाऊन देखील विचार केला असून मराठा व इतर समाजातील गोरगरिबांच्या मुलांना मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडावे म्हणून उच्च शिक्षणासाठी लागणारे 50 टक्के शुल्क परत करण्याची योजना आणली आहे. 500 कोटी रुपये यासाठी उपलब्ध करून दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार, व्यवसाय, उद्योग करू इच्छिणाऱ्या मुलांना मोठ्या प्रमाणावर बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कुलस्वामी सारख्या सहकारी पतपेढीनेदेखील यात पुढाकार घेऊन तरुणांना त्यांचे व्यवसाय उभे करण्यास मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

कुलस्वामी सहकारी पतपेढीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशी येथे आले होते. सेक्टर 19मधील कृषी बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर सिडको प्रदर्शन केंद्र येथे सभेत मुख्यमंत्री बोलत होते. 1000 कोटी रुपयांच्या व्यवसायातील उलाढाली बाबत संचालक मंडळ व सभासदांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात 13 हजार सहकारी पतपेढ्या असून केवळ 40 पतपेढ्या एवढा मोठा व्यवसाय करू शकतात. पुढील काळात पहिल्या 5 पतपेढ्यांत कुलस्वामीचे नाव यावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, पूर्वी सहकाराच्या नावाखाली केवळ स्वाहाकार झाला होता. आमच्या दृष्टीने शेतकरीही जगला पाहिजे आणि बाजारपेठ म्हणजेच व्यापारीही तगला पाहिजे. या दृष्टीने सहकारी संस्थांचीदेखील मोठी जबाबदारी आहे. आज देशातील तरुण इतका प्रतिभाशाली आहे की, तो केवळ नोकऱ्या मागू शकत नाही तर देऊही शकतो. नवनवीन व्यवसाय स्टार्ट अप म्हणून येताहेत पण त्यांच्या पंखात बळ तेव्हाच येईल जेव्हा बॅंका, सहकारी संस्था त्यांना पुरेसे अर्थसहाय्य करतील.

Post Bottom Ad