झेन सदावर्तेचा महापौरांच्या हस्‍ते सत्‍कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झेन सदावर्तेचा महापौरांच्या हस्‍ते सत्‍कार

Share This

परळच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील क्रीस्‍टल टॉवर या इमारतीस दिनांक २२ ऑगस्‍ट २०१८ रोजी लागलेल्‍या भीषण आगीच्‍याप्रसंगी प्रसंगावधान राखून आगीत अडकलेल्‍या रहिवाशांचे प्राण वाचविणाऱया कुमारी झेन सदानंद सदावर्ते (वय १०) हिच्‍या अतुलनीय धैर्याबद्दल मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी  मुंबईकरांच्‍यावतीने महापालिका मुख्‍यालयात (दि.०४ सप्‍टेंबर २०१८) दुपारी आयोजित एका समारंभात सत्‍कार करुन भविष्‍यातील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. 

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते विशाखा राऊत, राष्‍ट्रवादीचे गटनेते राखी जाधव, शिक्षण समिती अध्‍यक्ष मंगेश सातमकर, बेस्‍ट समिती अध्‍यक्ष आशीष चेंबुरकर, स्‍थापत्‍य समिती अध्‍यक्षा (उपनगरे) साधना माने, विधी समिती अध्‍यक्षा सुवर्णा करंजे तसेच नगरसेवक व नगरसेविका मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages