फेसबुक पोस्टवरून घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेसबुक पोस्टवरून घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

Share This

मुंबई - फेसबुकवरील पोस्टवरून घाटकोपर असल्फा येथे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर करण्यात आली. या पोस्टवरील कमेंट्सवरून वादाला तोंड फुटलं. या वादातून मनोज दुबे यांची हत्या करण्यात आली. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दुबे यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनोज दुबेंच्या हत्येप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या ज्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय ते दुबेंच्या परिचयाचे असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages