हाफकिनमार्फत खरेदी केलेल्या औषधांचा सात दिवसात पुरवठा करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2018

हाफकिनमार्फत खरेदी केलेल्या औषधांचा सात दिवसात पुरवठा करा

मुंबई - विविध विभागांमार्फत औषधांची आवश्यकता नोंदविलेले आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सुमारे 587 कोटी रुपयांच्या खरेदी केलेल्या औषधांचा पुरवठा येत्या 7 दिवसांत पूर्ण करण्यात यावा असे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. हाफकिन खरेदी कक्षाच्या कामकाजात समन्वय वाढविण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.  

या बैठकीला आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी, हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालिक संपदा मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आतापर्यंत झालेल्या औषध खरेदीचा आढावा घेऊन पुढील वर्षी वेळेवर औषध पुरवठा होण्याकरिता तसेच हाफकिन संस्थेला औषध खरेदी प्रक्रिया पार पाडण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी आणि विविध विभागाच्या औषधांची गरज याबाबत तपशीलवार चर्चा करण्यात आली.

बापट यांनी विविध विभागांना लागणारे औषध खरेदी करण्यासाठी समन्वय वाढविण्याची गरज विषद केली. सर्व संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी ही प्रक्रिया नीट पार पाडण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना संमती दिली. यामुळे पुढील वर्षाकरिता औषध पुरवठा सुरळीत पार पडेल असा विश्वास बापट यांनी यावेळी व्यक्त केला.

Post Bottom Ad