वडाळा ते जेकब सर्कल मोनो रेलसाठी राष्ट्रवादीचे निवेदन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वडाळा ते जेकब सर्कल मोनो रेलसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

Share This
मुंबई - मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टामंडळाने आज मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरण आयुक्त आर ए राजीव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व निवेदन सादर केले. चर्चेमध्ये तांत्रिक अडचणी दूर करून मुंबईकरांच्या सुखरूप प्रवासासाठी लवकरात लवकर मोनो रेल सुरू करावी अशी प्रमुख मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. आयुक्त आर ए राजीव यांनी याबाबत प्राधिकरण सकारात्मक विचार करीत असून शक्य तितक्या लवकर मोनोरेल सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगितले.

या शिष्टमंडळात आमदार किरण पावसकर, मा खासदार संजय दिना पाटील, मुंबई पदाधिकारी अशोक धात्रक-माजी आमदार, लक्ष्मण पुजारी, मनपा गटनेत्या सौ राखीताई जाधव, नरेंद्र राणे, कुमुद जयकर, क्लाईड क्रास्टो, मोहन म्हामूनकर,जिल्हाध्यक्ष-रमेश परब व विजय वाडकर, सुरेखाताई पेडणेकर, अभिजीत चव्हाण ,दीपक पवार, सोहेल सुभेदार, सुनील शिंदे, अमोल मातेले, मनीष दुबे, अमित तिवारी, मनोज व्यवहारे, व नितीन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages