झोपडीधारकांना २६९ फूटांऐवजी ३०० चौरस फुटांचे घर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2018

झोपडीधारकांना २६९ फूटांऐवजी ३०० चौरस फुटांचे घर


मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झोपडीधारकांना २६९ फूटांचे घर मिळत होते सरकारने त्यात वाढ करून ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा विचार सुरु केला आहे. याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. 
 
मुंबई विकास आराखड्याला राज्याच्या नगरविकास विभागाकडून अंतिम मान्यता देताना ३३ (५), ३३ (१०), ३३ (७) यासह पुनर्विकास करावयाच्या जवळपास सर्वच कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. सुधारित विकास आराखड्यास मान्यता देताना त्यावर मागवण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार झोपू योजनेतून देण्यात येणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील बीडीडी चाळ आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये फक्त वाढीव क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता झोपू योजनेतील घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने झोपडीधारकांना मोठ्या आकाराची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे एसआरए योजनेतील जवळपास १५०० ते २००० पुनर्विकास प्रकल्पातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विकासकांनाही ही योजना राबवताना चटई निर्देशांक आणि टीडीआर वापरावास मिळणार असल्याचे समजते. मात्र या निर्णयामुळे अनेक प्रकल्पांचे आराखडे नव्याने बदलावे लागणार असून उपलब्ध लोकांच्या संख्येनुसार त्यात काही फेरफारही करावे लागणार आहेत, असे कळते.

Post Bottom Ad