मुंबईत १५ नोव्हेंबर पासून १० टक्के पाणी कपात लागू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत १५ नोव्हेंबर पासून १० टक्के पाणी कपात लागू

Share This

मुंबई - मुंबईकरांवर गेले एक महिना छुप्या पद्धतीने सुरु पाणी कपात सुरु होती. आता पालिका प्रशासनाने गुरुवार १५ नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतलं आहे. त्यासाठी तलावांमध्ये पाण्याचा साठा कमी असल्याचे कारण दिले गेले आहे. 

मुंबईला वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. यावर्षी १ ऑक्टोबरला १३ लाख १७ हजार ८१९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. हा पाणीसाठा मागील वर्षापेक्षा ९ टक्के इतका कमी आहे. यामुळे १ नोव्हेंबर पासून ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबई शहरातील नागरिकांना सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करावी अशी सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. त्याबाबतचे निवेदन आज स्थायी समितीत सादर करण्यात असून हि पाणी कपात गुरुवार १५ नोव्हेंबरपासून लागू केली जाणार आहे. नागरिकांचे १० टक्के पाणीकपात करताना पाण्याच्या वेळेतही १५ टक्के कपात करण्यात करण्याचे सुचवले आहे. ही १० टक्के पाणीकपात ठाणे आणि भिवंडीलाही लागू असणार आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages