मुंबईत 7 लाख 85 हजार रुपयांची संशयीत रक्कम पकडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 April 2019

मुंबईत 7 लाख 85 हजार रुपयांची संशयीत रक्कम पकडली


मुंबई, दि. 20 - मुंबई शहर जिल्हयात गोल देऊळ भागात काल सायंकाळी निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाव्दारे 7 लाख 84 हजार 500 रुपयांची संशयीत रक्कम पकडली असुन, याबाबत व्ही. पी. रोड पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, निलेश नाईक यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गोल देऊळ, व्ही.पी. रोड, मुंबई येथे मारुती सियाज या मोटार कारची (एम.एच.03 सी.एम.8928) तपासणी केली असता सदर वाहनामध्ये वत्सल धर्मेश शाह याच्यांकडे 7 लाख 84 हजार 500 रुपये रक्कम आढळून आली. सदर रोख रक्कमेबाबत योग्य स्पष्टीकरण तसेच कागदपत्र सादर करु न शकल्याने ही रक्कम ताब्यात घेण्यात आलेली आहे. याबाबत व्ही.पी.रोड पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत. अशी माहिती 31- मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.

Post Bottom Ad