विक्रोळी पार्कसाईट येथे ट्रक अपघातात - चार ठार, एक गंभीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2019

विक्रोळी पार्कसाईट येथे ट्रक अपघातात - चार ठार, एक गंभीर

मुंबई - विक्रोळी पार्कसाईट परिसरात गुरुवारी रात्री एका ट्रक अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर आहे. जखमीवर राजावाडी रुग्णालयात सुरु आहेत. धान्याने भरलेला हा ट्रक रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्याने त्यात अडकून पलटी झाला. यावेळी बाजूला उभे असलेले पाच जण या ट्रकखाली दबले गेले. या गटाराचे काम अलीकडेच आठवड्याभरापूर्वी झाले होते. ते निकृष्ट असल्यानेच झाकण तुटले गेले, असा स्थानिकांचा आरोप आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील गटारांच्या झाकणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास धान्याने भरलेला हा ट्रक जात असताना विक्रोळी पार्कसाईट येथे ट्रकचे मागचे चाक तेथील गटाराचे झाकण तोडून आत रुतल्याने ट्रक पलटला. यावेळी रस्त्याच्या बाजूला उभे असलेले पाच जण या ट्रकखाली सापडले. हा ट्रक धान्याच्या गोण्यांनी भरलेला होता. त्यामुळे लोक मदतीला धावूनही प्रत्यक्ष मदत होऊ शकलेली नाही. पलटी झालेल्या ट्रकमधील गोण्या लोकांनी काढायला घेतल्या. काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक वर उचलला. मात्र तोपर्यंत या ट्रकखाली चारही जण चिरडले होते. एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी चेंबूर येथे गटाराचे काम सुरु असताना ट्रक पलटी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

मृतांची नावे --
अश्विनी हिबेरे (३४), विशाल शेलार (२२), हमीद अब्दुल शेख (४१), चंद्रशेखर मुसळे (३५)
जखमी --
चांद हसन शेख (३५)

Post Bottom Ad