साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल

Share This

नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या भाजपमध्ये प्रवेशापासून त्यांची उमेदवारी आणि तुरुंगात असताना त्यांच्यावर झालेले अत्यांचारपर्यंत प्रत्येक गोष्टी वादाच्या भोगवऱ्यात अडकली आहे. भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यानंतर सर्व स्तरातून साध्वी प्रज्ञासिंह यांचा निषेध केला जात आहे. निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमत करकरे यांच्यावर अपमानास्पद टीकेविरोधात गुन्हा दाखल केला असून यावर चौकशी सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

आयपीएस असोसिएशने ट्विट करत सांगितले आहे की, अशोक चक्र पुरस्कार विजेते हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना देशासाठी बलिदान दिले. भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करत आहोत. सर्व शहिदांच्या बलिदानाचा आदर केला पाहिजे असे सांगत साध्वी यांच्या विधानावर भाष्य केले आहे.

निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. करकरे यांनी मुंबई दशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाले आहेत, असे मत भोपाळ काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह - हेमंत करकरे हे त्यावेळी तपास अधिकारी होते. करकरे यांनी बोलवून सांगितले की, साध्वी यांना सोडून द्या. परंतु हेमंत करकरे यांनी म्हटले की, “मी काही करेन आणि पुरावे आणारच, मात्र साध्वीला नाही सोडणार”, ही त्यांची कुटिलता होती, हा देशद्रोह होता, धर्मविरुद्ध होता. ते मला विचारायचे की, “तुला सत्य जाणून घ्ये..न्यासाठी देवकडे जावे लागणार आहे. मी तेव्हा म्हटले की, तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता.” “मी करकरे यांना म्हटले होते की, तुझा सर्वनाश होणार, त्यांनी मला शीविगाळ केली. ज्या दिवशी मी तुरुंगात गेली तो दिवस सूतक सुरू होते. आणि जेव्हा दहशतवाद्यांनी करकरे यांना मारल्यानंतर सूतक संपले.”

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages