राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका

Share This
दिल्ली - काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाचा मुद्दा स्पष्ट होईपर्यंत निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावे, अशी सूचना निवडणूक आयोगाला करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गुरुवारी दाखल करण्यात आली. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकतीच राहुल यांना नोटीस बजावली असून त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तक्रारीवर त्यांनी पंधरा दिवसांमध्ये वस्तुनिष्ठ भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना केली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये 'राहुल गांधी यांनी स्वेच्छेने ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे का, हे ठरवण्यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने केलेल्या कृतीवर याचिकाकर्ते समाधानी नाही,'असे म्हटले आहे. जय भगवान गोयल आणि सी. पी. त्यागी यांनी ही याचिका दाखल केली आहे. गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी प्राथमिक पुरावे सादर करण्यात आले असल्यामुळे त्यांना सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. राहुल या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघांतून लढत आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages