जॅकलीन फर्नांडिस सुरू करतेय खास यू-ट्युब चॅनेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जॅकलीन फर्नांडिस सुरू करतेय खास यू-ट्युब चॅनेल

Share This

मुंबई - जॅकलीन फर्नांडिस तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी खास यू-ट्युब चॅनेल सुरू करतेय. यात अभिनेत्री होण्याच्या प्रवासासह ती आरोग्य, सौंदर्य, तणावांचा सामना कसा करायचा अशा विविध गोष्टींवर संवाद साधणार आहे. या माध्यमातून सकारात्मक विचारांना चालना देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. याद्वारे मी चाहत्यांशी संवाद साधणार आहे. माझ्या आयुष्याचा प्रवासही इथं उलगडेल. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, माझा ट्रॅव्हल ब्लॉग, या क्षेत्रात मला भेटणारे दिग्गज, फिटनेस आणि सौंदर्य याद्वारे मी इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. भीतीवर ताबा मिळवणं, तणावांचा सामना करणं याबद्दलही इथं संवाद घडेल.’

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages