काँग्रेसने 'बी टीम'बाबत खुलासा करावा, तरच पुढे बोलू - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काँग्रेसने 'बी टीम'बाबत खुलासा करावा, तरच पुढे बोलू - प्रकाश आंबेडकर

Share This

मुंबई - काँग्रेसने आमच्यावर भाजपची 'बी टीम' म्हणून टीका केली. त्या टीकेचा त्यांनी खुलासा करावा. तरच आम्ही विधानसभेत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील व्हायचे की नाही त्यावर बोलू, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

२८८ उमेदार उभे करू -
आमच्याकडे आतापर्यंत १ हजार १०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यात आणखी काही विभाग शिल्लक राहिले आहेत. त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. दसरा-दिवाळी दरम्यान निवडणुका होणार असून आम्ही २८८ उमेदार उभे करू. पहिली यादी ही ओबीसी या वर्गाची जाहीर केली जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज आपल्यावर कारवाई होईल म्हणून भाजपमध्ये जात आहेत. लोकसभेत आम्हाला ४० लाख मते मिळाली. त्यामुळे ज्या जागा आहेत, त्यावर नवीन चेहरे देण्याचे आमचे धोरण आहे. आमच्या संपर्कात राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे लोक आहेत. मात्र, आमचे अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलत नाही. आमचा उद्देश कोणत्याही पक्षाला कमी लेखण्याचा नाही. आम्ही पहिली उमेदवार यादीही या महिन्याच्या शेवटी जाहीर करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

१९ लाख ईव्हीएम मशीन गायब -
ईव्हीएमविरोधात देशात जनआंदोलन सुरू आहे. तर त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, की राजकीय पक्षांनी ईव्हीएम आंदोलनात सामील झाले तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. त्यासाठी बिगर राजकीय संघटनांनी लीड केले पाहिजे. निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात, यासाठी माझा प्रयत्न आहे. ईव्हीएमसाठी वेगळ्या पातळीवर लढण्याची गरज आहे. १९ लाख ईव्हीएम मशीन गायब आहेत. परंतु त्यावर कोणी बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages