बेस्ट संपाचा फैसला २३ ऑगस्टला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2019

बेस्ट संपाचा फैसला २३ ऑगस्टला


मुंबई - वेतनकरारासह विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिली होती. मात्र, बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मध्यरात्रीपासून पुकारलेला संप तूर्तास मागे घेतला असून शुक्रवारी (२३ ऑगस्ट) संपाबाबत कामगारांचे मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर संपाचा निर्णय घेण्यात येईल, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. दादर येथील श्रीकृष्ण मंदिर सभागृह येथे कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

बेस्ट कर्मचाऱ्यांची वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली आहे. तेव्हापासून कर्मचारी वेतन कराराच्या प्रतीक्षेत आहेत. वेतनकरारासह अन्य मागण्यांसाठी ७ जानेवारीलाही संप पुकारला होता. त्यावेळी ९ दिवस चाललेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. त्यानंतर नुकतेच बेस्ट प्रशासन व कर्मचारी संघटनांत सामंजस्य करार झाला आणि एप्रिल २०१७ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ऊर्वरित दहा वेतनवाढी मंजूर करून त्यांची तातडीने अंमलबजावणीही करण्यात आली. वेतनवाढीसंदर्भात अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला चार पत्रे दिली होती. मात्र प्रतिसाद न दिल्याने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा निर्णय घेतला होता. मात्र बेस्ट प्रशासनाने संप मागे घेत मुदत द्यावी, अशी मागणी केल्याने ६ आँगस्टचा संप तूताॅस मागे घेत २० आँगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. परंतु बेस्ट प्रशासनाने मागण्यांची लवकरात लवकर पूतॅता करणार असल्याचे २० आँगस्टचा संप तूताॅत मागे घेत असल्याचे राव म्हणाले. बेस्ट प्रशासन वेतन करारा बाबत सेनेला हाताशी धरुन टाळटाळ करत आहेत. त्यामुळे 21, 22, व 26 तारखेला इतर कामगार संघटनांसोबत चर्चा करणार आहोत. तर 23 ऑगस्ट 19 रोजी बेस्ट कामगार संपा बाबत मतदान घेऊन कौल घेण्यात येईल. त्यानंतर संपाची तारीख जाहीर केली जाईल.

Post Bottom Ad