उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी पालिकेचे नवे धोरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2019

उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी पालिकेचे नवे धोरण

मुंबई : मुंबईत असलेल्या उद्यानांचे प्रवेशद्वार, बसण्यासाठी असलेली बाकडे, हिरवळ सुस्थितीत हवी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध कराव्यात आदी सूचना मुंबईकरांनी पालिका प्रशासनाक डे केल्या आहेत. उद्याने व मैदानांच्या देखभालीसाठी महापालिकेकडून तयार करण्यात येणाऱ्या नव्या धोरणासाठी प्रशासनाने मुंबईकरांकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २५० हरकती, सूचना आल्या असून याची अंतिम मुदत १८ ऑगस्टपर्यंत आहे.

मुंबईतील उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी पालिका प्रशासनाकडून नवे धोरण तयार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याने, मैदानांबाबत मुंबईकरांना काय वाटते, कोणत्या सुविधा महत्त्वाच्या वाटतात आदींबाबत हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुंबईकरांनी आपल्या सूचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. यातील महत्त्वाच्या सूचनांचा विचार केला जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेच्या सुमारे १ हजार ६८ भूखंडांवर महापालिकेची उद्याने, मैदाने व मनोरंजन मैदाने आहेत. या सुविधांचा वापर नागरिकांद्वारे मोठ्या प्रमाणात नियमितपणे केला जातो. उद्यानांची व मैदानांची देखभाल स्वयंसेवी संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्या सहकार्याने अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, या दृष्टीने नवीन धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या स्तरावर सुरू आहे. धोरणाचा प्राथमिक मसुदा अधिकाधिक लोकाभिमुख पद्धतीने व सर्वसमावेशक असावा, यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने नागरिकांकडून सूचना, अभिप्राय व सल्ले आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. उद्याने व मैदाने देखभालीसाठी महापालिकेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या धोरणाच्या प्राथमिक मसुद्याबाबत नागरिकांद्वारे पाठवण्यात येणाऱ्या सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

Post Bottom Ad