आमदार महाले पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदार महाले पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले

Share This
मुंबई – लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दिग्विजयानंतर महाराष्ट्रातील विरोध पक्षांना लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाले हे पूर्वी शिवसेनेतच होते. ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

महाले हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे माजी आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी पक्षांतराचा मार्ग चोखाळल्याचे बोलले जाते. युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे महाले यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महाले हे पूर्वी शिवसेनेतच होते. ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्यासोबत नाशिकचे माजी खासदार कचरूभाऊ राऊत यांचे पुत्र दिलीप व दिंडोरीतील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी देखील होते. महाले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages