मुंबई दि. २२ ऑगस्ट - 'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' हे नवीन विशेष अभियान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' या नावाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खड्ड्यांचे फोटो काढून महापालिकेला टॅग करणार आहेत. त्यातील किती खड्डे बुजवले, नाही बुजवले हे प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विचारणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. #KhaddeKaAdda #MumbaiPotholes या हॅशटॅग खाली हे अभियान राबवण्यात येणार आहे. जनतेने या मोहिमेत सामील झाले पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी यावेळी केले. मुंबई महानगरपालिकेने ४०० ते ५०० खड्डे मुंबईत असल्याचा दावा केला होता मात्र मुंबईत २५ हजारच्या आसपास खड्डे आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आजपासून महापालिकेला टॅग करण्याचे अभियान सुरू होणार आहे.यामुळे खड्ड्याचे सोशल ऑडिट पण होईल. ही मोहीम जोपर्यंत मुंबईतील खड्डे बुजत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरु करत आहोत. जर कारवाई झाली नाही तर वॉर्डनुसार आंदोलन करू असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.