दडपशाही करत रयतेला अंधारात ढकलणारा राजा पुन्हा होणे नाही- धनंजय मुंडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दडपशाही करत रयतेला अंधारात ढकलणारा राजा पुन्हा होणे नाही- धनंजय मुंडे

Share This

मुंबई दि. 31- वीजचोरी करण्याबरोबरच दमनकारी नीतीचा अवलंब करत असताना महाजनादेश यात्रेत रथा साठी विजेच्या तारा तोडत रयतेला अंधारात टाकणारा राजा पुन्हा होणे नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व त्यांच्या जनादेश यात्रेवर केली आहे.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनादेश यात्रा काढून निवडणुकीसाठी जनमताची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना अनेक ठिकाणी जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. भीषण दुष्काळ आणि महापूर यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही त्यांनी असंवेदनशीलतेचा परिचय दिल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या या जनादेश यात्रेवर टीका होताना दिसून येत आहे.

त्यातच आज धनंजय मुंडे यांनी महाजनादेश रथयात्रेच्या मार्गक्रमणा साठी रस्त्यावरील विजांच्या तारा तोडत रयतेला अंधारात टाकण्याचे काम केली जात आहे जनतेला अंधारात ढकलणारा राजा पुन्हा होणे नाही अशी टीका ट्विट करून केली आहे. याबरोबरच या जनादेश यात्रेसाठी सत्ताधारी पक्षाकडून नच वीजचोरी केली जात आहे झाडांच्या फांद्या तोडत निसर्गाला हानी पोहोचवण्याचे काम हे सरकार करत आहे. यात्रा जसजशी पुढे जात आहे तसतशी जनतेतून उठणाऱ्या प्रत्येक आवाजाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे जनादेश यात्रेच्या माध्यमातून होत असलेली दडपशाही हुकूमशाही थांबवावी असा सल्ला देत ही लोकशाही असल्याची जाणीवही त्यांना करून देण्याचा धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages