मुंबई - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज तब्बल १११ उमेदवारांची जम्बो यादी जाहीर केली आहे. उमेदवारांना तिकीट देताना वंचितने त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. सर्व जातींना सत्तेत सहभागी करता यावे यासाठी वंचितने त्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. या यादीतून वंचितने भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम शिरस्कर यांचा बाळापूरमधून पत्ता कापला आहे.
वडाळ्यातून लक्ष्मण पवार, सायन कोळीवाड्यातून आमीर इद्रिसी, कलिनामधून मनीषा जाधव, घाटकोपर (पूर्व) मधून विकास पवार, घाटकोपर (पश्चिम) मधून जालिंदर सरोदे, चांदीवलीतून अब्दूल हसन अली हसन खान, अंधरी (पूर्व) मधून शरद यटम, अंधेरी (पश्चिम) मधून प्रकाश कोकरे, मालाड (पश्चिम) मधून सयीद सोहेल असगर रिझवी, चारकोपमधून मोरीस केणी, भांडूप (पश्चिम) मधून सतीश जयसिंग माने, विक्रोळीतून सिद्धार्थ भास्करराव मोकळे, बोरीवलीतून निखिल विनेरकर, मीरा भायंदरमधून सलीम अब्बास खान, दीपा वळवी (नंदूरबार), प्रा. सुनीन दादा सुरवाडे (भुसावळ), शफी अब्दुल नवी शेख (जळगाव, शहर), उत्तम सपकाळे (जळगाव, ग्रामीण), मोरसिंग राठोड (चाळीसगाव), डॉ. तेजल काळे (बुलडाना), सविता मुंढे (सिंदखेड राजा), इम्रान पंजांनी (अकोला, पश्चिम), हरिभाऊ भदे (अकोला, पूर्व), आलीम वाहिद पटेल (अमरावती), आनंद उमाटे (वर्धा), राजेंद्र काकडे (कामठी), भोजराज बोंडे (रामटेक), अॅड. नितीन बोरकर (भंडारा), अशोक रामराव खरात (जालना), राजेंद्र मगरे (बदनापूर), दीपक बोराडे (भोकरदन), राजपालसिंग गाबरूसिंग राठोड (परतूर), शेख मोहम्मद गौस (परभणी), मुकुंद चावरे (नांदेड, उत्तर), नामदेव आईलवार (भोकर), गोपाळ मगरे (गडचिरोली) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.