मुंबई - मातोश्रीमधील एक सदस्य पहिल्यांदाच निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे आयोजित मेळाव्यात जाहीर केले आहे. नव महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण मला साथ दया. अशी हाक देत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे.गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्वत: जाहीर करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थितित होते. उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची समजून काढण्यासाठी मतोश्रीवर असल्याचे सांगितले गेले.
वरळीत झालेल्या शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आज युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर केले आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्यात भाषण करताना व्यासपीठावर उपस्थित असलेले वरळीचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिका-यांची परवानगी घेवून निवडणूकीच्या रिंगणात उरतण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचे सर्वांनी स्वागत केले.आपल्याला वरळीचा विकास करायचा असून, सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. माझ्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.