रिडलर ऍप द्वारा मिळणार बेस्ट बस टिकिट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिडलर ऍप द्वारा मिळणार बेस्ट बस टिकिट

Share This

मुंबई - बेस्ट प्रवाशांच्या सोयीसाठी व् बसमध्ये प्रवासी व् वाहकांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणाऱ्या वाद टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्टचे रिडलर ऍप आता आधुनिक करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता या ऍप द्वारे बेस्ट प्रवाशांना बस तिकीट तसेच प्रवाशी आपले बसपासचे नूतनीकरण करणेही शक्य होणार आहे . 

अलीकडेच बसभाड्याचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून बस भाडे कमी झाल्यामुळे प्रवाशांना दैनंदिन प्रवासामध्ये सुट्ट्या पैशांची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे प्रवासी आणि बस वाहक यांच्यामध्ये दररोज वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे बेस्टचे रिडलर ऍप अधिकाधिक प्रवाशांनी वापरावे म्हणून पूर्वीपासून अस्तित्वात असलेले बेस्टने हें ऍप प्रवासीभिमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऍप द्वारा आता बसची तिकिटे मोबाईल द्वारा खरेदी करू शकतात, त्याचप्रमाणे याच ऍपद्वारा प्रवासी मासिक. त्रैमासिक, बसपासचे नूतनीकरण सुद्धा करू शकतात, तसेच इ वोलेट द्वारा मोबाईल बसपासचे नूतनीकरण सुद्धा करू शकतात

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages