पाच दिवसाच्या गणेशाचे थाटात विसर्जन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाच दिवसाच्या गणेशाचे थाटात विसर्जन

Share This
मुंबई - ढोल ताशांचा गजर...फुलांची आरास मांडत...गुलालाची उधळण करीत... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिभावाने पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला शुक्रवारी वाजत गाजत निरोप दिला. शहर व उपनगरांतील सार्वजनिक २३ व घरगुती ३९४८ एकूण ३९७१ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावांत सार्वजनिक ९ घरगूती ८४९ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.

सोमवारी २ सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण होते. दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी दुपारपासून गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा घननाद सुरु होता. पावसाची रिपरिप असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रीया, तरुण- तरूणींसह अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर मोठी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages