मनोज संसारेंना एमआयएमची उमेदवारी - धारावीतून निवडणूक लढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2019

मनोज संसारेंना एमआयएमची उमेदवारी - धारावीतून निवडणूक लढणार



मुंबई - वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तुटल्यानंतर एमआयएमने छोट्या दलित पक्षांना एकत्र करून दलित समाज जोडण्याचं काम सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमआयएमने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक मनोज संसारे यांना धारावी या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर स्वाभिमानीचे दुसरे नेते आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

विशेष म्हणजे संसारे यांचा वडाळा हा मतदारसंघ असताना त्यांना धारावीतून उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वडाळ्यात कालिदास कोळंबकर यांचं आव्हान पेलता येण्यासारखं नसल्याने संसारे यांनी धारावीचा मार्ग पत्करल्याचं बोललं जातं. धारावीत दलित आणि मुस्लिमांची मोठी संख्या आहे. त्यामुळेही त्यांनी धारावीतून लढण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यत येतं. एमआयएमकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी संसारे यांनी काँग्रेसकडून वडाळ्यातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांची भेटही घेतली होती. मात्र गायकवाड यांनी संसारे यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी धारावीतून लढणाऱ्या गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड यांना शह देण्यासाठीच धारावीची निवड केली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, स्वाभिमानीचे दुसरे नेते, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनीही सोलापूरच्या मंगळवेढ्यातून निवडणूक लढवण्याचा मनसुबा जाहीर केला होता. मात्र संसारे हेच एमआयएमच्या तिकीटावर लढत असल्याने शिंदेही एमआयएमच्या तिकीटावर लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमआयएमची यादी

डॅनियल रमेश लांडगे, वडगाव शेरी, पुणे

मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, मालेगाव मध्य

मोहम्मद फिरोज खान, नांदेड उत्तर

>> दुसरी यादी

शंकर भगवान सलगर, सांगोला, सोलापूर

फारुक मकबूल शब्दी, सोलापूर मध्य

सुफिया तौफिक शेख, सोलापूर दक्षिण

हिना शफिक मोमीन, कॅन्टोनमेंट, पुणे

>> तिसरी यादी

रत्नाकर ज्ञानू डावरे, कुर्ला

मोहम्मद सालिम कुरेशी, वांद्रे पूर्व

शाहवाज सर्फराज हुस्सैन शेख, अणुशक्तीनगर

वारिस पठाण, भायखळा

आरिफ मौनुद्दीन शेख, अंधेरी पूर्व

>> चौथी यादी

इकबाल अहमद खान, जालना

विवेक देविदास ठाकरे, रावेर, जळगाव

मोहम्मद युसूफ अब्दुल हमीद मुल्ला, धुळे

>> पाचवी यादी

गफार कादरी, औरंगाबाद पूर्व

नासेर सिद्दीक्की, औरंगाबाद मध्य

अरुण बोर्डे, औरंगाबाद पश्चिम

>> सहावी यादी

अली खान मोईन खान,परभणी

शेख शफीक मोहम्मद, बीड

प्रल्हाद धोंडीराम राठोड, पैठण

शकीबुल रहमान, कामटी

सुरेश जगधाने, श्रीरामपूर

सागर शिंदे, हातकणंगले

अन्वर फारुख शिंदे, धुळे

Post Bottom Ad