Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदार


मुंबई दि. 3 : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच 2 लाख 3 हजार 935 मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक दुसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी चिंचवड मतदारसंघात 5 लाख 17 हजार 004 मतदार आणि तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी नालासोपारा मतदारसंघात 5 लाख 12 हजार 434 अशी झाली आहे. सर्वात कमी मतदार असलेल्या दुसऱ्या क्रमांकाची मतदार नोंदणी कुडाळ मतदारसंघात 2 लाख 15 हजार 657 अशी आहे. सर्वांत कमी तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी सावंतवाडी मतदारसंघात 2 लाख 24 हजार 934 अशी झाली आहे.

2009 मध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदार 7 कोटी 59 लाख 72 हजार 310 होते. तर 2014 मध्ये एकूण मतदार 8 कोटी 35 लाख 15 हजार 425 असल्याची नोंद आहे. राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.

15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार -
विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे. 2019 विधानसभा मतदार नोंदणीत सर्वाधिक कमी मतदारांची नोंद वडाळ्यात असल्याचे दिसून आले आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर मध्य, डहाणू, मुलुंड, कलिना, वांद्रे (पश्चिम), धारावी, वडाळा, माहिम, वरळी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा शिवाजीनगर, पुणे कन्टोन्मेंट आणि सोलापूर शहर (मध्य) या मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहेत.

नागपूर दक्षिण -पश्चिममध्ये 2009 मध्ये 3 लाख 51 हजार 021 मतदार असल्याची नोंद आहे, तर 2014 मध्ये 3 लाख 41 हजार 300 मतदार असल्याची नोंद आहे.नागपूर मध्य मतदार संघामध्ये 2009 मध्ये 3 लाख 04 हजार 487 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 92 हजार 716 मतदार असल्याची नोंद आहे. डहाणूमध्ये 2009 मध्ये 2 लाख 36 हजार 251 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 34 हजार 175 मतदार असल्याची नोंद आहे. याप्रमाणेच इतर बारा मतदारसंघातही 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom