भाजपाचे 'आता बारा वाजणार' - प्रकाश मेहता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपाचे 'आता बारा वाजणार' - प्रकाश मेहता

Share This

मुंबई - माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाने तिकीट कापल्याची खंत असून, हा निर्णय मला न विचारता घेतल्याचे ते म्हणाले. भाजपाचे 'आता बारा वाजणार' असे बोलून त्यांनी पक्ष नेतृत्त्वाला इशारा दिला आहे. दरम्यान संतप्त प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी पराग शाह यांची गाडी फोडली आहे.

भाजपने पालिकेतील नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केल्यांनतर ते प्रकाश मेहता यांच्या घरी किरीट सोमय्यांसोबत गेले होते. यावेळी मेहता यांच्या समर्थकांनी पराग शहा व मेहतांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये पराग शहा यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली, असून त्यांची गाडी फोडण्यात आली. तसेच किरीट सोमय्या यांनाही धक्काबुक्की झाली. दरम्यान, पराग शहा गाडीतच बसून राहिले. शेवटी मेहता यांनी भावनिक होत शहा यांची गाडी कार्यकर्त्यांच्या तावडीतून बाहेर काढली. अशा प्रकारचे हाणामारीचे प्रकरण माझ्या राजकीय आयुष्यात कधीही घडले नसल्याचे प्रकाश मेहता यावेळी म्हणाले. पक्षाने मला आजवर भरभरून दिले असून, पक्षावर किंवा मुख्यमंत्र्यांवर कोणताही राग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पराग शहांची गाडी फोडली -
घाटकोपर पूर्वमधून माजीमंत्री प्रकाश मेहता यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मेहता यांना तिकीट नाकारून भाजपने पराग शहा यांना उमेदवारी घोषित केली. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी शहा यांची गाडी फोडली आहे. भाजपच्या चौथी यादी जाहीर झाल्यानंतर पराग शहा हे मेहता यांना घरी भेटायला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या व पराग शहा यांच्या गाडीवर प्रकाश मेहता समर्थकांनी हल्ला केला. तसेच त्यांनी पक्षाच्या खासगी सुरक्षारक्षकांना जोरदार मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही धक्काबुक्की झाली. पक्षाच्या चौथ्या यादीतही डिच्चू मिळाल्याने मेहता यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages