Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मुंबईत १ लाख ३८ हजार ‘नोटा’ला मतदान


मुंबई - विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घटली असली तरी मुंबईत तब्बल १ लाख, ३८ हजार, २७७ मतदारांनी 'नोटा' अर्थात, यापैकी 'एकही उमेदवार आम्हास नको' या पर्यायाचा वापर केला. यापैकी जोगेश्वरी पूर्वमध्ये १२०३१ तर बोरिवलीत १००९५ मतदारांनी 'नोटा'चा वापर केला. याखेरीज बहुचर्चित वरळी मतदारसंघातही ६३०५ मतदारांनी उमेदवारांना नाकारले. विशेष करून आरेमधील झाडे तोडल्याचा कारणावरून नोटाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे समजते. 

मुंबई शहरातील १० व उपनगरातील २६ अशा एकूण ३६ मतदारसंघांत मिळून एकूण ४९ लाख २४ हजार ९४८ मते ३३१ उमेदवारांना पडली. त्यातील १ लाख ३८ हजार २७७ 'नोटा' मते असल्याने या मतांची टक्केवारी २ लाख ८० हजार इतकी आहे. हा आकडा तसा कमी असला तरी वरळी व बोरिवलीत इतकी 'नोटा' मते पडण्यामागे नेमके कारण काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जोगेश्वरीतील 'नोटा' मतांचा आकडा हा आरे प्रश्न व जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या (जेव्हीएलआर) दूरवस्थेमुळे असलेल्या नाराजीबद्दल असल्याचे दिसून येत आहे.

या तीन मतदारसंघांखेरीज शिवडी, दहिसर, मागाठाणे, चारकोप, गोरेगाव, अंधेरी पूर्व, विलेपार्ले व कुर्ला येथील 'नोटा' मतांचा आकडा ४ हजारांच्यावर आहे. मुलुंडमधील आकडादेखील ५२०० इतका मोठा आहे. मुंबादेवीत सर्वात कमी म्हणजे १५३९ 'नोटा' मते आहेत. धारावी व मानखुर्द शिवाजीनगरमधील 'नोटा' मतांचा आकडा २ हजारांहून कमी आहे.

टक्केवारीचा विचार केल्यास जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील 'नोटा' मते सर्वाधिक ८.०८ व बोरिवलीतील ६.०८ टक्के इतकी आहेत. वरळीतील 'नोटा' मतांची टक्केवारी ४.८८ आहे. बहुतांश मतदारसंघातील 'नोटा' मतांची टक्केवारी २.५० ते ३.६० दरम्यान आहे. काही ठिकाणी दोन टक्क्यांहून कमी आहे.

लोकसभा मतदारसंघनिहाय 'नोटा'
दक्षिण मुंबई : २३,२५६
दक्षिण मध्य मुंबई : १८,३४०
उत्तर-मध्य: २१,२५८
वायव्य : २९,२२२
ईशान्य मुंबई : १९,५७०
उत्तर मुंबई : ३०,३६३

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom