मुंबईतील १० टक्के पाणी कपात पुढे ढकलली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील १० टक्के पाणी कपात पुढे ढकलली

Share This


मुंबई - पिसे उदंचन केंद्रातील कामामुळे पालिकेने मुंबईत ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत जाहिर केलेली १० टक्के पाणी कपात आता पुढे ढकलली आहे. ही पाणी कपात आता ७ ते १३ डिसेंबर दरम्यान होणार असल्याचे पालिकेने जाहिर केले आहे.

पिसे उदंचन केंद्रात न्यूमॅट्रिक गेट सिस्टिमची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे पाणी कपात पालिकेने जाहिर केली होती. मात्र ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने १ डिसेंबर ६ डिसेंबर या कालावधीत अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत येतात. त्यामुळे या कालावधीत पाणी कपात केल्यास पाणी टंचाई निर्माण होऊन अनुयायांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे जाहिर केलेली पाणी कपात पुढे ढकलावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने पालिका आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेऊन पालिकेने ही पाणी कपात पुढे ढकलली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages