आज महाराष्ट्र बंद - 50 हुन अधिक संघटना होणार सहभागी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आज महाराष्ट्र बंद - 50 हुन अधिक संघटना होणार सहभागी

Share This

मुंबई - केंद्र सरकारच्या सीएए सुधारित कायदा, एनआरसी विरोधात शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.  बंदमध्ये ५० हून अधिक राजकीय, कष्टकरी, सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. काही व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याने बाजारपेठ्या, दुकानेही बंद ठेवली जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटनाही सहभागी होणार आहेत. अनेक संघटनांनी पाठिंबा दिल्याने बंद १०० टक्के यशस्वी होईल, असा दावा वंचित आघाडीने  केला आहे.

सीएए, एनआरसी व एनआरपी आणि भारत सरकारच्या  आर्थिक दिवाळखोर व निर्गुंतवणूक धोरणा विरोधात  महाराष्ट्र बंदचे आवाहन संघटनांनी केले आहे.  देश आर्थिक संकटातून जात असताना लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना, हा कायदा लागू करणारच, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मांडत आहेत, हे दुर्दैव आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी शांततेत बंद केला जाईल, असेही वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघ, असंघटित कष्टकरी कामगार संघटना, महिला विकास संघटना, कुर्ला मोहल्ला कमिटी, रिपब्लिकन पँथर, समता काळामंच, राष्ट्र सेवा दल, लाल निशान पक्ष, मुस्लिम संघटना, लोकभारती आदी ५० हून अधिक संघटना सहभागी होणार आहेत. विद्यार्थी संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्याचे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages